स्थैर्य, सातारा, दि. १० : कृषीविभागाच्या शासन मान्यताप्राप्त राज्य कृषीसहाय्यक संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी विश्वजीत सरकाळे यांची बिनविरोध निवड झाली. विश्वजीत सरकाळे हे सर्कलवाडी ता. कोरेगांव येथील रहिवाशी असून त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठातून फलोद्यान विषयामध्ये विशेष प्राविण्यासह एम .एस्सी अॅग्री पदवी प्राप्त केलेली आहे. सरकाळे यांनी यापूर्वी कृषी सहाय्यक संघटने बरोबर भोर तालुक्यामध्ये जलसंधारण व शेती विकासासाठी उल्लेखनीय कामकाज केलेले आहे. ते अत्यंत अभ्यासू, हुशार व कामात तत्पर असलेले अधिकारी आहेत. त्यांनी आपले शेतामध्ये फळे, भाजीपाल्याची आधुनिक तंत्राने लागवड केली असून त्यातून भरघोस उत्पन्न घेतले आहे. विश्वजीत सरकाळे हे प्रसिद्ध कृषितज्ञ व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांचे पुतणे असून त्यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभते. विश्वजीत सरकाळे यांनी यापूर्वी संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून काम करत असतांना संघटन बांधणीचे केलेले कौशल्यपूर्ण कामकाज विचारात घेवूनच त्यांची कृषी सहाय्यक संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड केलेली आहे. या निवडीबद्दल विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत भोर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, मावळते जिल्हाध्यक्ष अतुल भोर, उपाध्यक्ष राजकुमार डोंगरे, तसेच पुणे जिल्हयातील कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी, सर्कलवाडीचे ग्रामस्थ यांनी विश्वजीत सरकाळे यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.