स्थैर्य, लोणंद, दि. २६: कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने पोलिस प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मास्क परिधान न करता वावरणार्या व्यापारी व नागरिकांवर लोणंदमधे धडक कारवाई करत दंड वसूल केला.
काही दिवसांपूर्वीच लोणंद पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले सपोनि विशाल वायकर यांनी सहकार्यांसह आज संध्याकाळच्या सुमारास लोणंद शहरातील कोरोना नियमांचे पालन न करणारांवर धडक कारवाई करत मोठया प्रमाणात दंड वसूल केला. काही नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मास्क न घालत फिरत असल्याचे दिसून येत आहे. घराबाहेर फिरताना विना मास्क वा कापड परिधान न करणार्या व्यक्तींविरुद्ध दंडाची कारवाई करण्यात येईल असा इशारा सपोनि विशाल वायकर यांनी या कारवाईतून लोणंदकरांना दिलेला आहे.
कारवाईत सपोनि विशाल वायकर यांच्यासह पोहवा श्रीनाथ कदम, संजय जाधव ,शिवाजी सावंत , फैय्याज शेख, संतोष नाळे, ज्ञानेश्वर मुळीक आणि चार होमगार्ड यांनी भाग घेतला. यावेळी नागरिकांनी विनामास्क घराबाहेर न पडण्याचे तसेच सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन लोणंद पोलिसांकडून करण्यात आले आहे.