
दैनिक स्थैर्य | दि. 31 जुलै 2025 | फलटण | जालना जिल्ह्यातील अंबड येथे कार्यरत असणारे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल कृष्णात खांबे यांची नियुक्ती फलटण उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून करण्यात आलेली आहे.
याबाबतचा शासन आदेश नुकताच निर्गमित झालेला आहे.
येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांची सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई येथे बदली झाली आहे.