
दैनिक स्थैर्य | दि. १७ जुलै २०२५ । फलटण । जे फलटण तालुक्यातील व जिल्ह्यातील नाहीत, अश्या नेतृत्वाच्या सोबत आम्ही कामकाज करू शकत नाही. श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वात आम्ही युवक राष्ट्रवादीमध्ये काम करू असे म्हणत फलटण ची राष्ट्रवादी म्हणजे भाजपाची बी टीम आहे, अशी माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्व पदांचा राजीनामा देत असल्याची माहिती फलटण तालुका सरचिटणीस विराज सोनवलकर यांनी दिली.
राजीनाम्याबाबत विराज सोनवलकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली. त्या दरम्यान ते बोलत होते.
फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याच्या नावाचा गैरवापर काही उपरे करत आहेत. तालुक्याच्या बाहेरून आलेल्यांनी फलटणशी नाते जोडू नये व स्वतःला फलटणकर म्हणून घेवू नये, असे मत सुद्धा सोनवलकर यांनी स्पस्ट केले आहे.