दैनिक स्थैर्य । दि.१७ जानेवारी २०२२ । सातारा । कोरोना महामारीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अतित येथील एका हॉटेल चालकावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मीनाज कुंडकाज चंद्रकांडी (वय २५, रा. माजगाव फाटा, हॉटेल राजमुद्रा, अतित, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, सातारा ते कराड जाणाऱ्या महामार्गालगत माजगाव फाट्यावर हॉटेल राजमुद्रा आहे. दि. १४ रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास हे हॉटेल सुरु ठेवून चालक असलेल्या मीनाज चंद्रकांडी याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलीस नाईक दादा वसंत स्वामी (वय ३५) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मिनाज चंद्रकांडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार शिंदे करत आहेत.