दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२१ । फलटण । धुमाळवाडी (ता.फलटण) येथील धबधब्यावर कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्या हौशी पर्यटकांवर फलटण पोलीसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला. सदर कारवाईमध्ये रुपये 7 हजार 500 चा दंड वसूल करण्यात आला आहे.
सदरची कारवाईवेळी पर्यवेक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यादव, राऊत, बडे, धुमाळवाडी ग्रामसुरक्षा दल व ग्रामपंचायत सदस्य संदिप पवार उपस्थित होते.
दरम्यान, सदरच्या कारवाईबद्दल धुमाळवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करुन पर्यवेक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे यांना धन्यवाद दिले.