
दैनिक स्थैर्य । दि.०७ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केलेले असतानाही येथील जिल्हा रुग्णालय व सातारा शहर परिसरात आपले अस्तित्व लपवून वावरत असताना आढळून आल्याने सुरज राजु माने रा. लक्ष्मीटेकडी झोपडपट्टी सदरबझार, सातारा याच्याविरोधात आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुरज राजु माने त्याला पोलीस अधीक्षक अजय बंसल यांनी २४ डिसेंबर २०२१ रोजी एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातुन हद्दपार केले होते. तरीही त्याने सातारा जिल्ह्यात देण्याबाबत कोणतीही पूर्व परवानगी न घेता तो सातारा येथील जिल्हा रुग्णालय व शहर परिसरात आपले अस्तित्व लपवून वावरत असताना आढळून आल्याची तक्रार पोलीस शिपाई संतोष जयसिंग कचरे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर माने याच्यावर आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.