कोरोनाबाबतच्या उपाययोजनेचे उल्लंघन केल्यास प्रशासनाकडून होणार दंडात्मक कारवाई – जिल्हाधिकारी शंभरकर


स्थैर्य, सोलापूर, दि. 6 : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने कोरोनाच्या उपाययोजनेचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.

नागरिकांनी सार्वजनिक स्थळी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासामध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, चेहऱ्यावर मास्क/रूमाल वापरणे बंधनकारक आहे. स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक असून नाक, डोळे व तोंड यांना स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असे पदार्थ विक्री करणारी दुकाने व पानटपऱ्या बंद ठेवण्यात याव्यात. दुचाकीवर केवळ चालक, तीन चाकी वाहनात चालक व इतर दोन आणि चार चाकी वाहनात चालक व इतर दोघांना परवानगी असेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तालुकास्तरावर तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, पोलीस प्रशासन, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (आरोग्य), नगरपालिका मुख्याधिकारी, स्वच्छता निरीक्षक, तलाठी, ग्रामसेवक यांनी कोविड उपाययोजना नियम 2020 अन्वये दंडात्मक कारवाई करावी, असेही त्यांनी आदेशाता नमूद  करण्यात आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!