
दैनिक स्थैर्य । 5 एप्रिल 2025। सातारा । फलटण तालुक्यातील ३२ गावे व कोरेगाव उत्तर येथील २६ गावांमध्ये टंचाई बद्दल आमदार सचिन सुधाकर पाटील यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर टंचाई कालावधीमध्ये फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही गावांना पाणी टंचाई भासू देणार नाही. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना अर्थात टँकर, खाजगी विहीर अधिग्रहण या बाबींसाठी आवश्यक तो निधी तातडीने देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिले.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री ना. शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी आमदार सचिन पाटील, आमदार अतुल भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागरजन यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्यासह सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टंचाई कालावधीमध्ये जो कोणी अधिकारी कामचुकार पणा करेल अश्या अधिकाऱ्यांची मनमानी कारभार चालू देणार नाही, असे निर्देश सुद्धा यावेळी आमदार सचिन पाटील यांनी दिले.