सोनगाव गायरान अतिक्रमण नियमानुकुल करा यासाठी ग्रामस्थांची निवेदने

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२२ । फलटण । सोनगाव मधील गायरान जमिनीमध्ये अतिक्रमण केलेली बहुसंख्य लोक हे दारिद्र्य रेषेखालील , आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत तसेच शेती महामंडळातील कर्मचारी म्हणून काम करीत होते. त्यांच्या आयुष्यभराच्या मिळकतीतुन साचविलेला पैसा हा आपल्या घरांचे स्वप्न पूर्ण करणेसाठी या जागांमध्ये गुंतवला , या मधील सर्वच लोक भूमिहीन व बेघर आहेत तसेच शेती महामंडळातील सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या खोल्या सोडल्याशिवाय सेवानिवृत्ती फ़ंड मिळत नसले कारणाने आणि राहण्यासाठीही जागा नसलेने नाईलाजास्तव गायरान जमिनी मध्ये आपला साचविलेला पैसा घरांसाठी खर्च केला.

साधारण तीन ते चार पिढ्या हे सर्वच लोक सोनगाव गायरान मध्ये राहत आहेत यादरम्यान कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने घर बांधनेस मनाई केली नाही . परंतु नोव्हेंबर २०२२ अखेरीस या सर्वच लोकांना अतिक्रमण हटवण्यासाठी महसुल विभागाकडून नोटिस आले आहेत. या नोटिसप्रमाणे ३१ डिसेंबर अखेर अतिक्रमण हटवावेत असा आदेश दिले आहेत .

ग्रामपंचायत सोनगाव गायरान जमीन गट नं ११५,३०५,९२,९४,१३५,२२२ आणि १४१ या सर्व गटामध्ये सोनगाव बंगला, लांडगेवस्ती, विरकरवस्ती ,जगतापवस्ती, मागासवर्गीय समाजमंदिर, दलीतवस्ती सुधार योजनेतून पिण्याच्या पाण्याचा टाक्या, दलित वस्ती डांबरीकरण, स्मशानभूमी, पाईपलाईन, पथदिवे, ग्रामपंचायत कार्यालय, मंदिरे, समाजमंदिर या सुखसोयी या गायरान जमिनीमध्ये च आहे हे बांधत असताना प्रशासनाने मनाई केली नाही .

अतिक्रमण हटाव च्या निर्णयामुळे गायरान मध्ये वास्तव्यास असलेली सर्वच लोक पिढ्यां पिढ्या राहत असलेले घर सोडून जाणे शक्य नाही, ही सर्वच कुटुंबे रस्त्यावर येतील , एकीकडे शासन प्रत्येकाला घर आशा योजना राबवित असताना एवढ्या कष्टाने घरे पाडून तेथील लोकांना रस्त्यावर आणणे योग्य व हिताचे नाही ही भूमिका सर्वच गावाची आहे. म्हणून सोनगाव गायरान जमीनीवरील पिढ्यांपिढ्या असलेले अतिक्रमण नियमित करावे यासाठी दूध संघ फलटण चे मा. चेअरमन व मा. नगरसेवक फलटण श्री भीमदेव बाबासो बुरुंगले व सोनगाव गावचे विद्यमान सरपंच सौ ज्योत्स्नाताई रमेश जगताप यांच्या नेतृत्वाखाली व सर्व तरुण मंडळ ,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ , यांच्या उपस्थितीत गायरान जमीन अतिक्रमण नियमित करावे यासाठी विविध अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले त्यामध्ये
१).मा.मुख्यमंत्री सो महाराष्ट्र राज्य मुंबई, २).मा जिल्हाधिकारी सातारा, ३).मा.समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सातारा, ४).मा. अनुसूचित जाती आयोग पुणे, ५) मा.प्रांताधिकारी सो फलटण , ६) मा तहसीलदार सो फलटण ७) मा.गटविकास अधिकारी सो फलटण पंचायत समिती फलटण, ८)नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस, ९) राज्य सचिव वैभव तानाजी गीते सो आणि सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अनिरुद्ध गायकवाड, १०) समाजकल्याण आयोग महाराष्ट्र राज्य पुणे. या सर्वांना निवेदन देण्यात आले.

यामध्ये ज्येष्ठ नेते व विद्यमान सदस्य व मा सरपंच सोनगाव पोपटराव बुरुंगले, कोयना लखन पिंगळे ग्रा.सदस्य , राणी संतोष गोरवे ग्रा.सदस्य, सुजाता कोंडीबा लांडगे ग्रा सदस्य, दिलीप भंडारे मा उपसरपंच व विद्यमान ग्रा. सदस्य , प्रा राजेश निकाळजे, रमेश जगताप, लखन पिंगळे, संतोष गोरवे, राजेंद्र आडके, महादेव कांबळे, पवन भोसले, राजेंद्र टेंबरे , संतोष मोरे, शशिकांत डोंबाळे, शशिकांत मोरे, अमोल सस्ते, सचिन लांडगे, हनुमंत टेंबरे, बाळासो गायकवाड, डॉ योगेश बुरुंगले, धर्मराज लांडगे, अरविंद लवटे, हनुमंत थोरात, बाळासाहेब पिंगळे (मा.तंटामुक्ती अध्यक्ष), गणेश कांबळे, रमेश मदने, राहूल गायकवाड, अरुण लांडगे (तंटामुक्ती अध्यक्ष), दीपक लोंढे (पोलीस पाटील) संतोष आडके, राहुल यादव, उत्तम शेंडे, नामदेव शिंदे, अक्षय जगताप, दत्तात्रय ननावरे, हनुमंत ननावरे, अक्षय खांडेकर, सोमनाथ गायकवाड, अतुल लोंढे, ज्ञानदेव कोकरे, दादासो बंडगर, सचिन शेवते, शिवाजी ढवळे, नवरंग खरात, सचिन कांबळे, अमर भोसले, सोमनाथ यादव, लक्ष्मण गायकवाड, श्रीमंत निंबाळकर, नाथा खाडे, महादेव चव्हाण, कांतीलाल चव्हाण, सचिन चव्हाण, सुरेश गेजगे, प्रकाश नामदास, स्वप्नील गेजगे, गणेश नामदास, यश नामदास, हनुमंत निकाळजे , गुलाबराव डोंबाळे, दीपक लांडगे, नाथा जगताप रोहन भोसले, हरिश्चंद्र गोरवे, व इतर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!