
दैनिक स्थैर्य । 26 मे 2025। फलटण । अलगुडेवाडी येथील 23 नं फाटा येथे एका आश्रमशाळा चालकाने पावसाने पाणी अडविल्याने परिसरातील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी गैरसोय होत आहे. संबंधितांनी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अलगुडेवाडी येथील 23 नं फाटा येथे पूर्व बाजू व फलटण-आसू मार्गाकडून निकम वस्तीच्या बाजूने पुढे पाण्याच्या पाटाने जाते.
परंतु साठलेले पाणी पुढे एका आश्रमशाळेकडे जाते. परंतु या आश्रमशाळा चालकाने पाणी पुढे जाण्याच्या मार्गांवर अतिक्रमण करून पाण्याचा प्रवाह अडविला आहे. त्यामुळे पूर्व बाजूच्या मंदिर, ज्ञानोबा नरुटे वस्ती इ. परिसरात पावसाचे पाणी साठल्याने हा परिसर जलमय झाला आहे. साठलेल्या पाण्यास जाण्याचा मार्ग नाही. पाणी साठल्याने परिसरात डासांचे प्रमाण वाढते. तसेच पाण्यामध्ये काहीवेळा साप, विंचू येतात त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच याठिकाणी शाळेच्या संडासचा मैला 23 फाट्यात सोडला आहे. संबंधितांनी या आश्रमशाळा चालकावर कठोर कारवाई करून, पाणी जाण्यास वाट द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.