दैनिक स्थैर्य । दि.१५ फेब्रुवारी २०२१ । कोरेगाव । जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशी इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी सुरू झालेली आहे यातच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक बंडोबांनी तर आपल्या गटातील व गणातील गावांमध्ये जाऊन गाव बैठका व जेवणावळी सुरू केल्याचे चित्र उत्तर कोरेगाव तालुक्यात पहावयास मिळत आहे अशातच पक्षाकडून उमेदवारी मिळाली नसतानादेखील इच्छुक बंडोबा मात्र मोठ्या जोमात प्रचार करताना दिसत आहेत काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बंडोबांची मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाद्वारे सामाजिक कामाचे फोटो व आपणच सर्वश्रेष्ठ असल्याची भूमिका हे बंडोबा पसरवत असताना दिसून येत आहेत खुर्चीसाठी झटत असणारे हे बंडोबा उत्तर कोरेगाव तालुक्यातील गावागावात दिसत आहेत तसे पाहिले तर राज्यात काही वर्षांपूर्वी सत्तेसाठी चाललेला तब्बल दीड महिन्याचा खल पहाता जनता आता लोकप्रतिनिधींकडे विनोदाचा विषय म्हणून पाहत असते मात्र उत्तर कोरेगाव तालुक्यात आत्ताच हॉटेल व ढाब्यांवरती काही बंडोबा पत्रकार परिषदेचे आयोजन करताना दिसून येत आहेत या बंडोबांना पत्रकारांनी बातम्या देऊन जरी खूश केले तरी जनता मात्र या इच्छुक बंडोबांना व यांच्या खोट्या आश्वासनांना भुलणार नाही काही इच्छुक बंडोबांना पक्षाने उमेदवारी दिली नसतानादेखील आपण पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत पक्ष आपलाच विचार करेल अशा आविर्भावात काही बंडोबा फिरत असल्याचे दिसून येत आहे तसे पाहिले तर उत्तर कोरेगाव तालुक्याला विधान परिषदेचे माजी सभापती शंकरराव आण्णा जगताप सोडले तर एकही असा लोकहितवादी लोकप्रतिनिधी लाभलेला नाही. अशातच जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्याने इच्छुक बंडोबांची मोठ्या प्रमाणावर भाऊगर्दी दिसत आहे मात्र “ये पब्लिक है सब जानती है ” असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. त्यामुळे उत्तर कोरेगाव तालुक्याला गृहीत धरणाऱ्या बंडोबांनी आपला खोटा चेहरा जनतेने उघडा पडण्यापेक्षा आहे त्यात सुखी राहावे व योग्य उमेदवाराला संधी द्यावी. त्यामुळे उत्तर कोरेगाव तालुक्यातील जनता पुन्हा एकदा म्हणू लागली आहे निवडणूक आल्या रे विठू पोपट बोले मिटू मिटू.