ग्रामदैवत फलटण श्री काळभैरवनाथ श्री जोगेश्वरी मंदिर, जिर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहण सोहळा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ मार्च २०२३ । फलटण । ग्रामदैवत फलटण श्री काळभैरवनाथ श्री जोगेश्वरी मंदिर, भैरोबा गल्ली, फलटण येथे जिर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहण सोहळा सोमवार, दि.२७ मार्च रोजी दुपारी १२.३६ वाजता विधीवत करण्यात येणार असून भाविकांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा, असे आवाहन श्री भैरवदेव देवस्थान ट्रस्ट, फलटणच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे शुभहस्ते जिर्णोद्धार लोकार्पण आणि कलश पूजन होणार असून त्यानंतर श्री सेवागिरी महाराज देवस्थान, पुसेगावचे मठाधिपती १०८ प.पू.श्रीमहंत श्री सुंदरगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते कलशारोहण होणार आहे. फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपकराव प्रल्हाद चव्हाण समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे माजी चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समिती माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहण सोहळ्यानिमित्त शनिवार, दि.२५ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत फलटण तालुक्यातील एकतारी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आणि सायंकाळी ०६.३० वाजता झी मराठी फेम, ह.भ.प.गीतांजली महाराज अभंग-भुजबळ यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे.

रविवार, दि.२६ मार्च रोजी सायंकाळी ०५ वाजता कलश नगर प्रदक्षिणा, रात्री ९ वाजता कलश धान्य निवास हा विधी होईल व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि.२७ मार्च रोजी सकाळी ०८ ते दुपारी १२.१५ वाजेपर्यंत वेदशास्त्र संपन्न, मुख्य पुरोहित चंदूकाका वादे व इतर ब्रह्मवृंद यांचे पौरोहित्याखाली श्री गणपती पूजन, पुण्याहवाचन, होमहवन हे धार्मिक विधी संपन्न होतील.
दुपारी १२.३६ वाजता श्री काळभैरवनाथ श्री जोगेश्वरी. मंदिराचा कलशारोहण सोहळा, आरती, सत्कार समारंभ, मनोगत व आभार प्रदर्शन होईल.

भैरोबा गल्ली, फलटण परिसरातील माहेरवाशीण यांचा यथोचित सत्कार आणि महाप्रसाद असा कार्यक्रम होणार आहे. फलटण पंचक्रोशीसह तालुक्यातील भाविकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री भैरवदेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.अशोकराव जाधव, उपाध्यक्ष प्रदीप पवार, नंदकुमार घारगे, अरुण आंबोले, मधुकर आंबोले, अनंत भोंसले, संजय पालकर, अविनाश पवार, रामदास पवार, गोरख पवार, शाम कापसे, भाऊ कापसे, रामचंद्र भोसले, संजय डमकले, राजेंद्र भांडवलकर विश्वस्त मंडळाने केले आहे.


Back to top button
Don`t copy text!