दैनिक स्थैर्य । दि. ०२ सप्टेंबर २०२२ । अमरावती । अधिकाधिक नागरिकांना ‘पोकरा’चा लाभ मिळवून द्यावा. ‘मनरेगा’तून अधिकाधिक रोजगार निर्मिती करावी व दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज केले.
माझा एक दिवस माझ्या शेतकऱ्यासाठी उपक्रमात मंत्री श्री. सत्तार यांनी सादराबाडी येथे भेट दिली, त्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्यांची, तसेच शेतकऱ्यांसमवेत चर्चा ग्रामसचिवालयाच्या प्रांगणात झाली त्यावेळी ते बोलत होते .आमदार राजकुमार पटेल, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर गावाच्या सरपंच लक्ष्मीताई पटेल जिल्हाधिकारी पवनीत कौर मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, आमदार राजकुमार पटेल, कृषी सहसंचालक किसनराव मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, जिल्हा कृषी विकास अधिकारी जी डी देशमुख यांच्यासोबत सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सादराबाडी येथे ग्रा.पं. सभागृहासाठी 25 लाख रुपये निधी मिळवून देण्याची घोषणाही मंत्री सत्ता यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, आदिवासी क्षेत्रात कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. आदिवासी विकास महामंडळ मार्फत धान्य खरेदीची प्रक्रिया वेळेत सुरू व्हावी. शेतकरी बांधवांना कर्जपुरवठा गतीने व्हावा.मेळघाटातील स्थलांतर थांबण्यासाठी मनरेगातून अधिकाधिक कामे राबवावी व रोजगार निर्मितीचे प्रमाण वाढवावे, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी ग्रामस्थ बांधवांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्याच्या व त्याचे निराकरणाचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. श्री. पटेल श्री. भिलावेकर श्रीमती कौर व श्री. पंडा यांनीही मनोगत व्यक्त केले. मंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते विविध योजनेच्या लाभाचे वितरण लाभार्थींना करण्यात आले.