दादासाहेब मोकाशींनी जिद्दीने शिक्षणाचा वटवृक्ष साकारला विलास चौधरी यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दादासाहेब मोकाशी यांच्या प्रतिमेचे पूजन करताना, विलास चौधरी, पुष्पा चौधरी व अन्य

स्थैर्य, कराड, दि. 19 : शिक्षणमहर्षी दादासाहेब मोकाशी यांनी शिक्षणाचा वाढवलेला वटवृक्ष सहज व सोपा उभारलेला नसून, त्यासाठी त्यांचे प्रामाणिक कष्ट, प्रगल्भ इच्छाशक्ती अन् आपल्या गावाकडील लोक, तरूणांसाठी स्वावलंबनाची राहिलेली तळमळ कामी आली आहे. तरी, दादासाहेबांचे हे स्वप्न शंभर टक्के पूर्णत्वास नेण्यासाठी मोकाशी शैक्षणिक संकुलातील प्रत्येकाने जिद्द, निष्ठा व प्रामाणिकपणे कार्यरत राहणे हीच दादासाहेबांना खºया अर्थाने श्रध्दांजली ठरेल असे भावनिक आवाहन मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे संचालक विलास चौधरी यांनी केले.

कराडनजीकच्या राजमाची येथील शिक्षणमहर्षी दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलात दादसाहेब उर्फ भगवानराव मोकाशी यांच्या १५ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते. करोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर सर्वते निर्बंध काटेकोरपणे पाळून मोकाशी प्रतिष्ठानच्या सर्व शाखांच्या प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी दादासाहेब मोकाशी यांच्या प्रतिमेचे विलास चौधरी व पुष्पा चौधरी यांच्याहस्ते पूजन करण्यात आले.

विलास चौधरी म्हणाले, की दादासाहेबांना कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नसून, आर्थिक पाठबळही नव्हते. परंतु, प्रचंड धडपड आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हा शैक्षणिक संकुलाचा डोलारा उभारला. १९ जून २००५ रोजी दादासाहेबांच्या निधनाची वार्ता समजली. आणि मोकाशी शैक्षणिक परिवारासह अनेकांना धक्का बसला. परंतु, दादासाहेबांचे पूत्र या संस्थेचे जनरल सेक्रेटरी अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष विश्वजीत मोकाशी या बंधुंनी कुठल्याही प्रकारचा अनुभव नसतानाही सर्वांना विश्वासात घेऊन आज ही संस्था वाढवली. दादासाहेबांनी व त्यांच्या दोन्ही पुत्रांनी अतिशय कमी कालावधीत मोकाशी शैक्षणिक संकुलात कृषी, अन्न तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कनिष्ठ महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र असा शाखा विस्तार करून या अभ्यासक्रमांना खºया अर्थाने चालना देताना, ही सर्व महाविद्यालये दर्जोन्नतीने प्रतिष्ठेची बनवली आहेत. त्यातील विद्यार्थी व सेवकवर्गाला उत्तम सोयीसुविधांबरोबरच जिंकण्याची उर्मी व ठाम आत्मविश्वास दिला जात असल्याचे चौधरी यांनी या वेळी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!