
दैनिक स्थैर्य | दि. ११ फेब्रुवारी २०२५ | फलटण | फलटण उपविभागात अलिकडे झालेल्या प्रशासकीय बदलांमध्ये एक महत्त्वाची नियुक्ती झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी फलटण प्रांताधिकारी सचिन ढोले यांची बदली झाली होती, ज्यानंतर अद्याप कोणत्याही नूतन प्रांताधिकारी यांची नियुक्ती झाली नव्हती. या रिक्त जागेची भरून काढताना परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी विकास व्यवहारे यांची फलटण प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विकास व्यवहारे यांनी यापूर्वी माळशिरस येथे अप्पर तहसीलदार म्हणून काम केले आहे. त्यांच्या कार्यक्षमता आणि निर्णयक्षमतेचे कौतुक स्थानिक अधिकारी व कर्मचारी वारंवार करत असतात. त्यांच्या नियुक्तीबद्दल निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, नायब तहसीलदार तुषार देशमुख यांनी अभिनंदन करीत त्यांचा यथोचित सत्कार केला आहे.