
दैनिक स्थैर्य । दि. १६ नोव्हेम्बर २०२२ । फलटण । कोळकी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी युवा नेते विकास नाळे यांची बिनविरोध निवड नुकतीच करण्यात आली आहे. संजय कामठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंचपदी विकास नाळे यांची निवड करण्यात आली.
फलटणचे उपनगर समजले जाणाऱ्या कोळकी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी विकास नाळे यांची बिनविरोध निवड नुकतीच संपन्न झाली. संजय कामठे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला होता. यावेळी उपसरपंच पदी विकास नाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटी गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह सामाजिक राजकीय शैक्षणिक कृषी व अन्य सर्वच स्तरांमधून विकास नाळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
कोळकी ग्रामपंचायतचे उपसरपंच विकास नाळे यांची प्रगतशील शेतकरी म्हणून सुद्धा ओळख संपूर्ण पंचक्रोशी मध्ये आहे. यासोबतच बहुसंख्य मताने निवडून आलेले सदस्य म्हणून सुद्धा विकास नाळे यांची ओळख फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे.