उदयनराजे यांनी दिल्या सातारकरांना विजयदशमीच्या शुभेच्छा; पारंपारिक पध्दतीने भवानी तलवारीचे विधिवत पूजनं

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑक्टोबर २०२१ | सातारा | सातारा शहरात पारंपारिक पध्दतीने पण साधेपणाने सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला . खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारकरांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत मानाच्या भवानी तलवारीचे पूजन केले.

साताऱ्याच्या शाही दसऱ्याची महाराष्ट्रात मोठी शानं आहे. साताऱ्याच्या राजघराण्यातील मंडळी पोवई नाक्यावर येऊन सीमोल्लंघन करत सोने लुटतात अशी परंपरा आहे. या पारंपारिक सोहळ्याचा सातारकरांनी अनुभव खासदार उदयनराजे भोसले यांनी भवानी मातेची व भवानी तलवारीचे पूजन केले. यावेळी जलमंदिर वर राजघराण्यातील निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या विधिवत पूजनानंतर उदयनराजे यांनी करोनाचे विघ्न हटू दे आणि ऐश्वर्य आणि समृद्धी सर्वत्र नांदू दे, असे साकडे भवानी मातेला घालत सर्व सातारकरांना विजया दशमीच्या शुभेच्छा दिल्या. साताऱ्याची भरभराट आणि समृध्दता हेच आपले उद्दिष्ट असल्याचे ऊदयनराजे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यानंतर उदयनराजे यांनी पोवई नाक्यावर येऊन सीमोल्लंघन केले . येथील शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले . यावेळी सातारकरांनी एकमेकांना आपट्याची पाने देत सोने लुटण्याचा आनंद घेतला.


Back to top button
Don`t copy text!