
दैनिक स्थैर्य | दि. १२ नोव्हेंबर २०२१ | फलटण | महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी वाई येथे झी मराठी वाहिनीवरील मन झालं बाजींद या मालिकेच्या चित्रीकरण स्थळी सदिच्छा भेट दिली. मालिकेचे निर्माते तेजपाल वाघ, दिग्दर्शक अनिकेत साने व प्रमुख कलाकार कृष्णा (श्वेता खरात), राया (वैभव चव्हाण), मामी (बिना कालेकर) यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
विजयसिंह मोहिते पाटील यांनी संपूर्ण टीमशी संवाद साधला. सर्व कलाकारांचे व टीमचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
या भेटी बद्दल निर्माते तेजपाल वाघ म्हणाले, विजयदादा नेहमीच माझ्या प्रत्येक कलाकृतीला आशीर्वाद देण्यासाठी सेटवर येतात, आज ते खास आमच्या भेटीसाठी वाईला आल्याने आम्ही सर्वजण भारावून गेलो आहोत.