दैनिक स्थैर्य । दि. २७ डिसेंबर २०२२ । मुंबई । विजय सेल्स या भारतातील अव्वल ग्राहक रिटेल कंपनीने इंडिया इंटरनॅशनल कंझ्युमर फेअरसह सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शनाची घोषणा केली आहे आणि या शॉपिंग अनुभवला अधिक उत्साहवर्धक करण्यासाठी सॅमसंग, एलजी, सोनी, अॅप्पल, वनप्लस, एमआय, बोट यासारख्या ६५ हून अधिक ब्रॅण्ड्सवर सूट देत आहे. हे प्रदर्शन महामारीच्या दोन वर्षांनंतर सुरू आहे आणि सर्वात मोठे असून ग्राहकांना २०२२ चा निरोप घेण्यापूर्वी त्यांच्या स्वत:ला व प्रियजनांना आनंद देण्याची संधी देत आहे, जसेच आणखी एक यशस्वी वर्ष गाठण्यासाठी सज्ज आहे.
इंडिया इंटरनॅशनल कंझ्युमर फेअरसोबत सुरू असलेला १३-दिवसीय प्रदर्शन २ जानेवारी रोजी समाप्त होईल. हे प्रदर्शन हा स्वतःच एक अनुभव आहे, जे सर्वात नुकतेच लॉन्च करण्यात आलेल्या व सर्वोत्तम तंत्रज्ञानाने युक्त ब्रॅण्ड्सच्या सर्व प्रकारांना दाखवते आणि ग्राहकांना प्रत्यक्ष स्टोअरमध्ये ऑफर केलेल्या सुविधांपेक्षा अधिक व्यापक श्रेणी देते. सर्व ब्रँड्सचे स्वतःचे विभाग असतील, ज्यात ग्राहकांना अभूतपूर्व उत्पादनांना पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी देण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. सणासुदीच्या जल्लोषात नवीन गॅझेट्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी हे प्रदर्शन अत्यंत योग्य आहे.
विजय सेल्सचे संचालक निलेश गुप्ता म्हणाले, ‘‘आम्ही आमचे रिटेल व ऑनलाइन स्टोअरमध्ये एण्ड ऑफ द इअर सेल सुरू केले असताना हे प्रदर्शन समाप्त होत असलेल्या या वर्षाचे आणखी एक खास आकर्षण आहे. आम्ही कोविडमुळे लादण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर या प्रदर्शनाला आणखी भव्य स्वरूपात आयोजित केले आहे, कारण आम्ही २०२० आणि २०२१ मध्ये या प्रदर्शनाला चुकवले. खरेतर आम्ही २०१९ मधील आकडेवारींच्या तुलनेत आमची विकास आकडेवारी १०० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा करत आहोत.’’