कटफळच्या सरपंचपदी विजय कांबळे बिनविरोध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२३ । बारामती । कटफळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विजय रमेश कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. गुरूवारी (दि. २०) सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये कांबळे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी एल. एस. मुळे यांनी कांबळे यांची निवड जाहिर केली.तत्पूर्वी पुनम किरण कांबळे यांच्यावर मार्च २०२३ मध्ये अविश्वास ठराव एकमताने मंजुर झाल्याने त्यांना सरपंचपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पुनम कांबळे यांनी या अविश्वास ठरावाच्या विरोधात जिल्हाधिकाºयांकडे अपिल केले होते. यावेळी जिल्हाधिकाºयांनी ठरावाच्या बाजूने निकाल दिला होता. यानंतर पुनम कांबळे यांनी जिल्हाधिकाºयांच्या निकालाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपिल केले होते. मुंबई उच्च न्ययालयाने देखील ठरावाच्या बाजूने बुधवारी (दि. १९) निकाल दिला. जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण असताना ठरावाच्या बाजूने अ‍ॅड. प्रसाद गावडे तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये अ‍ॅड. सुशांत प्रभुणे यांनी काम पाहिले, अशी माहिती सदस्य संग्रामसिंह मोकाशी यांनी दिली.

दरम्यान सरपंचपदी निवड झाल्यानंतर सर्वसमावेशक काम करून गावातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी उपसरपंच सीमा मदने, सदस्य डॉ.संजय मोकाशी,  तात्याराम रांधवण,  संध्याराणी झगडे , संध्या मोरे,सविता लोखंडे, लक्ष्मण झगडे ,गणेश आटोळे, देवीदास झगडे ,कालिदास मोकाशी ,बाळासो आटोळे ,मोहन मोकाशी ,भालेराव मोकाशी उपस्थित होते. सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणुन ग्रामसेवक एम.डी बेंगारे यांनी काम पाहिले.


Back to top button
Don`t copy text!