दैनिक स्थैर्य । दि.२७ जानेवारी २०२२ । फलटण । फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे विजय घोलप यांची लहुजी शक्ती सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आलेली आहे. जिल्हा उपाध्यक्ष पदी विजय घोलप यांची निवड झाल्यांनतर संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे, प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांनी अभिनंदन केले व सातारा जिल्ह्यामध्ये लहुजी शक्ती सेना बळकट करण्यासाठी कार्यरत राहणार आहे, असेही विजय घोलप यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष पदी राजीव खिलारे, फलटण तालुका शहर अध्यक्ष विजयभाऊ भोंडवे तर फलटण तालुका पूर्वभाग अध्यक्षपदी रोहित घोलप यांची निवड करण्यात आलेली आहे.
सदरील कार्यक्रमासाठी प्रसिद्ध उद्योजक विजयभाऊ खवळे, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख रामभाऊ पाटोळे, कुमार रिटे, सत्यवान अडागळे, अप्पासाहेब ननावरे, गणेश कांबळे, विजयराव गायकवाड, राजाभाऊ बाबर, सचिन बाबर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप यांनी मानले.