
स्थैर्य, म्हसवड, दि. 31 : स्व. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या वतीने प्राथमिक स्वरुपात लाॅकडाऊन मध्ये आडकलेल्या सामान्य हातावर पोट भरणार्या , व काम केल्याशिवाय चुल पेठत नाही अशा लोकांना मदतीचा हातभार लागावा यासाठी त्याकाळी हां प्रस्ताव मांडला होता त्या न्याय योजनेच्या माध्यमातुन युवक काँग्रेसच्या वतीने ५० कुटुंबांना प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे कोंग्रेसचे युवा नेते व म्हसवडचे माजी. नगराध्यक्ष विजय धट यांच्या कडून देण्यात आले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंग्रेस पक्षाने काढलेल्या जाहीर नाम्यात न्याय योजनेचा समावेश करण्यात आला होता. न्याय योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला दर वर्षी ७२००० रुपये म्हणजे महिण्याला ६००० रुपये आणि दिवसाला २०० रुपये देण्याचे आश्वासन कोंग्रेस पक्षाने दिले होते परंतु देशात मोदी सरकार आलं या सरकारला गोरगरीब मजदुरांच्या अडचणीशी काही ही देने घेणे नाही त्या मुळे देशातील युवक काँग्रेसच्या वतीने एक दिनका न्याय हे आंदोलन राबविण्यात आले व देशातील सर्व विधानसभा मतदारसंघात गरजु १११ कुटुंबांना प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे एक दिवसाचा न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे व केंद्र सरकारला या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील कीमान सहा महिने या योजनेतुन मात तालुक्यातील गोर गरीब जनतेला मदतीचा हातभार लागावा व मदत मिळावी या साठी प्रयत्न करण्याचे आश्वासन या वेळी माजी नगराध्यक्ष विजय धट यांनी दिले.