स्थैर्य, सातारा, दि.२: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवसानिमित्त केंद्रीय सर्तकता आयोगाच्या सुचनेनुसार दि. 27 ऑक्टोबर ते दि. 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह देशभर राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक, अशोक शिर्के व इतर अधिकारी, कर्मचारी यांनी सातारा जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
प्रवर अधीक्षक डाकघर सातारा मंडल सातारा या ठिकाणी श्रीमती अपराजिता मिधा मॅडम, सिनीयर सुप्रिडेंट पोस्ट ऑफिसर व श्री.डी.व्ही.सर्जेराव असिस्टंट सुप्रिडेंट ऑफ पोस्ट ऑफिस यांचे समवेत पोस्ट ऑफीसचे कर्मचार्यांसमवेत ऑनलाईन सेमिनार घेवून दक्षता जनजागृती सप्ताहाच्या आयोजनाचे महत्व व उद्देश विषद केले.
रहिमतपूर पोलीस स्टेशन गु.र.नं. 146/2020 भ्र.प्र.का.क. 7 नुसार आलोसे बाळु बाबुराव वाघ वय 54 वर्षे व्यवसाय नोकरी पद मजुर सार्वजनीक बांधकाम उपविभाग कोरेगांव शाखा रहिमतपूर, रा. रहिमतपूर, ता. कोरेगांव, जि. सातारा यांच्याविरुध्द लाच मागणी करुन स्विकारले वरुन कारवाई करण्यात आली आहे.
दक्षता जनजागृती सप्ताहाचे प्रसिध्दीसाठी व लोकांमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनजागृती व्हावी या दृष्टीने आकाशवाणी केंद्र , सातारा या एफ.एम.वृत्तवाहिनीवर अशोक शिर्के पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि.सातारा यांनी मुलाखत दिली असून सदर मुलाखतीचे प्रसारण झाले आहे.
यशवंतराव चव्हाण इन्स्टीटयुट ऑफ सायन्स सातारा या महाविद्यालयात प्राचार्य डॉ. जाधव, उपप्राचार्य देशपांडे यांचे समवेत महाविद्यालयाचे कर्मचारी व विद्यार्थी यांचे ऑनलाईन सेमिनार घेवून त्यांना दक्षता जनजागृती सप्ताहाच्या आयोजनाचे महत्व व उद्देश विषद केले. त्यांनी विचारलेल्या शंकाना उत्तरे दिली. अॅन्टी करप्शन ब्युरो सातारा कार्यालयापासुन जिल्हाधिकारी कार्यालय सातारा, पोवईनाका तेथुन बॉम्बे रेस्टॉरंट चौकापर्यंत व पुन्हा अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालय पर्यंत खाजगी/प्रवासी वाहतूक करणार्या तीन चाकी व चारचाकी वाहनांची रॅली काढण्यात आली. या रॅलीतील वाहनांवर व्यापक प्रसिध्दी व जनजागृतीसाठी अॅन्टी करप्शन ब्युरोचे बॅनर्स, स्टीकर्स, टोल फ्री नंबर 1064, भ्रष्टाचार विरोधी घोषवाक्ये असलेले बोर्ड लावुन रॅली काढण्यात आली. सातारा शहरातील खाजगी प्रवासी वाहतूक संघटनेतील सदस्य, चालक, मालक यांची या ला. प्र. वि. सातारा कार्यालयाचे आवारामध्ये बैठक आयोजीत करण्यात आली होती.
लोकांना भ्रष्टाचार निर्मुलन संदर्भाने मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांना तक्रारी देण्याकरीता आवाहन केले. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेवून त्यांचे निराकरण केले. सप्ताहादरम्यान सातारा शहर, नागठाणे, ता. सातारा, जोशीविहीर, ता. वाई, पांचवड, ता.वाई वाई शहर, रहिमतपूर, ता. कोरेगांव, वाठार स्टेशन ता. कोरेगांव, सातारारोड, ता. कोरेगांव, मेढा, ता. जावली लोणंद ता. खंडाळा, फलटण शहर, कराड शहर, उंब्रज, ता. कराड शहरामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गर्दीच्या विविध ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रसिध्दीसाठी व तक्रारदार मिळणेकरीता टोल फ्रि क्रमांक 1064 संबंधाने व्हिजीटींग कार्डचे वाटप करण्यात आले तसेच जनजागृतीसाठी भित्तीपत्रके चिकटवण्यात आली.
भ्रष्टाचारासंबधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणार्या लोकसेवकाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या सुरवातीला जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे रामचंद्र शिंदे अप्पर जिल्हाधिकारी सातारा यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आयोगाकडुन प्राप्त झालेल्या शपथेचे वाचन करून शपथ दिली व राज्यपाल महाराष्ट्र यांच्या संदेशाचे वाचन केले. त्यानंतर मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन करुन दाखविले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन उपस्थितांना दक्षता जनजागृती सप्ताहाच्या आयोजनाचे महत्व व उद्देश विषद केले.