
दैनिक स्थैर्य । 15 मार्च 2025। विडणी । विद्यानगर (विडणी) अभंग वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीच्यावतीने वार्षिक स्नेहसंमेलन ’उत्सव 2025’ या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि.15 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता करण्यात आले आहे.
स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. बालवयात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेले स्नेहसंमेलन एक व्यासपीठच असते. अनेक विद्यार्थ्यांच्या मध्ये विविध कला गुण असतात त्यामध्ये त्यांनी प्राविण्य मिळविलेले असते. विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमातून आपले विविध कलाविष्कार सादर करीत असतात.
या स्नेहसंमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक व पालक यांच्यावतीने करण्यात आले आहे .