विद्या प्रतिष्ठान चा ओम सावळेपाटील कऱ्हाड मॅरेथॉन मध्ये दुसरा


दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२२ । बारामती । विद्या प्रतिष्ठान कमल नयन बजाज अभियंत्रकी महाविद्यालय चा विद्यार्थी व बारामती सायकल क्लब चा खेळाडू ओम सावळेपाटील याने कऱ्हाड येथील मॅरेथॉन स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला आहे.

रविवार 27 नोव्हेंबर रोजी कऱ्हाड शहरात डेक्कन स्पोर्ट्स क्लब कोल्हापूर यांनी ‘आरोग्यदायी धावणे ‘ या स्लोगन सहित आरोग्याच्या जनजागृती साठी बालकापासून ज्येष्ठा पर्यंत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं या मध्ये 14 ते 17 वयो गट आणि 18 वर्षा पुढील वय गट आशा गटात स्त्री व पुरुषा साठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 18 वर्ष पुढील वयोगटात ओम सावळेपाटील यांनी 21.1किमी अंतर 1 तास पंचवीस मिनिटात पूर्ण करून सदर स्पर्धा पूर्ण करून दुसरा क्रमांक पटकविला
या स्पर्धे मध्ये राज्यभरातून 2हजार स्पर्धेकांनी भाग घेतला होता.

डेक्कन स्पोर्ट्स क्लब कोल्हापूरचे अध्यक्ष उदय पाटील, संचालक वैभव बेळगावकर व कऱ्हाड हेल्थ ऑर्गनायझेशन चे उपाध्यक्ष महेश पवार आदी च्या शुभहस्ते बक्षिस समारंभ पार पडला या प्रसंगी कऱ्हाड सायकल क्लब चे अध्यक्ष नवनाथ शिंदे आणि बारामती सायकल क्लब चे अध्यक्ष श्रीनिवास वाईकर व स्पर्धेक, खेळाडू, प्रशिक्षक, आदी उपस्तित होते.


Back to top button
Don`t copy text!