
दैनिक स्थैर्य । 13 एप्रिल 2025। फलटण । विडणी, ता. फलटण येथील विदुला शुभांगी सुधीर देशपांडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यकपदी निवड झाली आहे.
विदुलाने महिलांमधून 27 वी रँक मिळवत यश संपादन केले. सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेल्या विदुलाने आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले. विदुलाचे प्राथमिक शिक्षण विडणी येथील जिल्हा परिषद शाळा तर माध्यमिक उत्तरेश्वर हायस्कूल येथे झाले. तिने 11 वी 12 मुधोजी हायस्कूल मध्ये केले. तिने शारदाबाई पवार महिला महविद्यालय बारामती येथून मायक्रोबायोलॉजी या विषयामध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
तिचा भाऊ कमिन्स कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. आई निवृत्त पूर्व प्राथमिक शिक्षिका आहे. वडील शेतकरी आहेत. खाजगी कंपनीमध्ये काम करून तिने हे यश संपादन केले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.