विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची विविध राज्यांच्या एम्पोरियमला भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ सप्टेंबर २०२२ । नवी दिल्ली । महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज दिल्लीतील बाबा खडकसिंह मार्ग स्थित विविध राज्यांच्या एम्पोरियमला भेट दिली  आणि  राज्यांच्या हस्तकला व त्यांचे प्रदर्शन-विक्री विषयीही माहिती जाणून घेतली.

श्री. झिरवाळ यांनी आज येथील कॅनॉट प्लेस भागातील बाबा खडकसिंह मार्गावरील स्टेट एम्पोरिया बिल्डींगमध्ये विविध राज्यांच्या कारागिरांच्या हस्तकलांचे दालन असणाऱ्या एम्पोरियमला भेट दिली.

श्री. झिरवाळ यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या मऱ्हाटी एम्पोरियमला भेट दिली. महाराष्ट्र लघु उद्योग विकास मंडळाच्यावतीने येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या राज्याच्या वैशिष्टयपूर्ण हस्तकलांची माहिती  त्यांनी जाणून घेतली. यांनतर श्री. झिरवाळ यांनी अनुक्रमे जम्मू-कश्मीर, गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि  खादी इंडिया एम्पोरियमला भेट देवून हस्तकला वस्तुंची माहिती जाणून घेतली. सरकारच्या ट्राईब्स इंडिया या एम्पोरियमला भेट देवून त्यांनी  येथे प्रदर्शित करण्यात आलेल्या विविध राज्यांतील आदिवासींच्या  हस्तकलांची पाहणी केली व माहिती जाणून घेतली.

दरम्यान, श्री. झिरवाळ यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली. यावेळी  परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी त्यांचे स्वागत केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यावेळी  उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!