
दैनिक स्थैर्य । 28 जुलै 2025 । फलटण । डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एस. जी. भावे यांना संरक्षण मंत्रालयाच्या डीजीएनसीसीच्यावतीने कर्नल कमांडंट ही पदवी देण्यात आली. ही पदवी एनसीसी महाराष्ट्र संचालनालय मुंबई यांच्या सूचनेमार्फत एनसीसी ग्रुप कोल्हापूर ग्रुप अंतर्गत कमांडिंग ऑफिसर 19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराड यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आली.
याप्रसंगी ब्रिगेडियर आर. के. पैठणकर, कमांडिंग ऑफिसर सत्यशील बबेर, लेफ्टनंट डॉ. हेमंत बोराटे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी एनसीसी अधिकारी उपस्थित होते.
मा. कुलगुरू यांना डीजीएनसीसीद्वारा दिली जाणारे कॉन्फरिंग ऑर्डर सन्मानपूर्वक देण्यात आले. त्याप्रसंगी ब्रिगेडियर आर. के. पैठणकर व कर्नल सत्यशील बबेर, डॉ. नारखेडे, कुलसचिव डॉ. सावर्डेकर विद्यापीठाबद्दलची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी ब्रिगेडियर आर.के. पैठणकर ग्रुप कमांडर कोल्हापूर ग्रुप, कर्नपल सत्यशील बबेर कमांडिंग ऑफिसर 19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराड, सुभेदार मेजर दुर्गा दत्त 19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराड, आमदार शेखरजी निकम, कार्यकारी परिषद सदस्य संदीप राजपुरे, विनायक काशीद, जयवंत जालगावकर, नगराध्यक्ष सौ. घाग सुभाष चव्हाण तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे पदाधिकारी व कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, वनशास्त्र महाविद्यालय तसेच कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे डॉ. सौ. पूजा सावंत यांनी सूत्रसंचालन केले व कार्यक्रमाचे प्रदर्शन लेफ्टनंट डॉ. हेमंत बोराटे आभार मानले.
कार्यक्रमाची सांगता एनसीसी गीत व राष्ट्रीय गीताने झाले.