दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑगस्ट २०२४ | फलटण |
खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता न देण्यासाठी सरकारच्या विरोधात पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी ‘कॉलेज बंद’ संप पुकारला आहे.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मिळालेल्या परवानगीच्या निषेधार्थ क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई, पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर, स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व पशुविज्ञान संस्था महाविद्यालय अकोला, पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी या महाविद्यालयातील पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी या संपात सहभाग घेतला आहे. या संपास प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळच्या विद्यार्थ्यांनीही जाहीर पाठिंबा दिला आहे, अशी माहिती राहुल राजेंद्र महामुनी, प्रदेश सरचिटणीस (पशुवैद्यकीय विभाग), राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांनी दिली.