
स्थैर्य, फलटण, दि. ०९ सप्टेंबर : गेली ५० वर्षे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता आणि त्यांच्या पत्नी सौ. इंदुमती मेहता यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात, जैन सोशल ग्रुप फलटणच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी जैन सोशल ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष श्रीपाल जैन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “अरविंद मेहता यांचे जैन सोशल ग्रुपला नेहमीच सर्वतोपरी सहकार्य आणि मोलाचे मार्गदर्शन लाभत आले आहे.” त्यांच्या या सत्कार्याने ग्रुपने मेहता यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.
या सन्मान सोहळ्यावेळी जैन सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेश दोशी, सचिव सौ. निना कोठारी, खजिनदार राजेश शहा, उपाध्यक्ष प्रीतम शहा, माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, सचिन शहा, सहसचिव हर्षद गांधी, संचालक डॉ. मिलिंद दोशी, सौ. मनिषा घडिया, जनसंपर्क अधिकारी विशाल शहा, इव्हेंट चेअरपर्सन तुषार शहा, सदस्य डॉ. ऋषिकेश राजवैद्य, राहुल गांधी यांच्यासह ग्रुपचे बहुसंख्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.