स्थैर्य, पुणे, दि. २४ : ज्येष्ठ रंगकर्मी अविनाश देशमुख यांचे प्रदीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते.
हौशी नाटकांतून काम करण्यासाठी त्यांनी पत्नी स्वाती देशमुख यांसह ‘सीमांत’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आणि ‘इथे ओशाळला मृत्यू’ या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ऐतिहासिक नाटकांचे हजारो प्रयोग त्यांनी देशभरात सादर केले.
याशिवाय त्यांनी ‘कुर्यात सदा टिंगलम’, ‘ही श्रींची इच्छा’, ‘प्रेमाच्या गावा जावे’ आदी नाटकांची निर्मिती करत त्यामध्ये देशमुख यांनी भूमिका साकारली होती. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे ते माजी उपाध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी स्वाती, मुलगी ऋजुता, मुलगा चैतन्य, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.