श्रीमंत रामराजेंवर टीका करण सोप्पं असतं पण श्रीमंत रामराजे बनणं लय म्हणजे लय अवघड – अभिजित निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०१ फेब्रुवारी २०२२ । फलटण । फलटण सारख ऐतिहासिक शहर साकारत असताना “नगराध्यक्ष” पदापासुन आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करत श्रीमंत रामराजे यांनी आपली विकासाची दूरदृष्टी दाखवून दिली मग ते जकातीचा खाजगीकरण करून नगरपालिकेचे उत्पन्न वाढीचा यशस्वी प्रयोग असो, अतिक्रमणांच्या प्रश्नांसाठी श्रीमंत रामराजे शॉपिंग सेंटर व अन्य ठिकाणी केलेल पुनर्वसन असो. किंवा शहरातील पिण्याच्या पाणी संदर्भातील सोमवार पेठ येथे भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून उभारलेला भव्य पाण्याया टॅंक असो, तसेच रस्ते मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे असो, जनतेच्या आरोग्य हितासाठी आत्ता चालु असलेली भुयारी गटर योजना असो, जनतेच्या हितासाठी सार्वजनिक कामांना प्राधान्य देऊन हे सर्व करणं फार अवघड असत पण, टीका करणं फार सोपं असतं !

१९९५ मध्ये अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले असतांना तत्कालीन युती सरकारला कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करण्यास भाग पाडण फार अवघड असत पण, टीका फार करणं सोपं असतं !

जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे) पदांवर काम करण्याची संधी मिळाल्यानंतर धोम बलकवडी व नीरा देवधर या प्रकल्प माध्यमातून फलटण,खंडाळा, माण,खटाव,उत्तर कोरेगाव या दुष्काळी भागात कालव्याद्वारे पाणी आणून दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम करण फार अवघड असत पण, टीका करणं फार सोपं असतं !

तालुक्यातील मुलांना तालुक्यातचं शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून Engineering College,Agri College उभारण फार अवघड असत पण, टीका करणं फार सोपं असतं !

शिरवळ , खंडाळा, लोणंद ,फलटण मध्ये MIDC आणून रोजगार संधी वाढवणे फार अवघड असतं पण, टीका करणं फार सोपं असतं !

अडचणी मध्ये आलेले साखर कारखाने,सहकारी संस्था बाहेर काढून जनतेला आधार देणं फार अवघड असत पण, टीका करणं फार सोपं असतं !

कोरोना आपत्तीत कोरोना संक्रमणाचा धोका असताना दररोज हजारो माणसांना भेटून त्यांच्या अडीअडचणी सोडवण फार अवघड असत पण, टीका करणं फार सोपं असतं !

स्वतःचा विचार न करता समाजातील सामान्य जनतेचा विचार करणं फार अवघड असत पण, टीका करणं फार सोपं असतं !

यादी मोठी आहे पण, आज इतकंच !

अनेकांनी आजवर बदनाम करण्याचंच काम केल परंतु श्रीमंत रामराजे परीस आहेत लक्षात असूद्यात !

– अभिजित पंडीतराव निंबाळकर,
तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,फलटण.


Back to top button
Don`t copy text!