महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत Vertex Study Point च्या विद्यार्थ्यांचा डंका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ५ जुलै २०२३ | फलटण |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणार्‍या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०२० पोलिस उपनिरीक्षक पदाचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत फलटणमधील Vertex Study Point या अभ्यासिकेत अभ्यास करणारे विद्यार्थी श्री. स्वप्निल हनुमंत बनकर (निंबळक), श्री. महेश बबनराव जगताप (सुरवडी), श्री. अजय सुनिल मिसाळ (फलटण) यांची पोलीस उपनिरीक्षक वर्ग-२ या पदावर लोकसेवा आयोगाकडून निवड झाली आहे.

या निवडीबद्दल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर (बाळराजे) यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांचे वेळोवेळी Vertex Study Point अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांना सहकार्य लाभते.

Vertex Study Point ही अभ्यासिका गेले ३ वर्ष फलटणमध्ये MPSC, UPSC सरळ सेवा भरती परीक्षेसाठी अभ्यास करणार्‍या तसेच १० वी, १२ वी, CET, NEET तसेच इतर होतकरू विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी कार्यरत आहे आणि याच अभ्यासिकेतून आत्तापर्यंत २० हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांमध्ये यश मिळवलं आहे. Vertex Study Point येथे फलटण तालुक्यातील अनेक विद्यार्थी सेवेचा लाभ घेतात. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासिकेत विविध क्षेत्रातील अधिकारी वर्गाकडून विशेष मार्गदर्शन केले जाते. लवकरच Vertex Career Academy सुरू होत असून फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांना पुणे शहरात मिळणार्‍या सर्व सुविधा तसेच मार्गदर्शन आपल्या फलटणमध्येच अल्प दरात उपलब्ध करण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!