
दैनिक स्थैर्य । 14 मे 2025। तरडगाव । फलटण येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या येथील सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या 10 वी बोर्ड परीक्षेचा विद्यालयाचा निकाल 96.52% लागला.
या विद्यालयातील जय महेंद्र भोसले याने 89.20% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. रिया सत्येंद्र कुमार कानडे 89.00% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. तर विजय विठ्ठल शिंदे 88.60% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. या परीक्षेस एकूण 116 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 111 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 04 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. 01 विद्यार्थी अनुपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या अध्यक्षा श्रीमती सविता काकी सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), ऑनररी जनरल सेक्रेटरी डॉ. सचिन भैय्यासाहेब सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र भैय्या सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, सर्व समित्यांचे अध्यक्ष व सदस्य सर्व ग्रामस्थ व पालक तसेच प्रशालेच्या प्राचार्या सौ. एस. जी काकडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले.

