महाबळेश्वर येथून वेण्णा नदी संवाद यात्रेचा उत्साहात प्रारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२२ । सातारा । “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत “चला जाणुया नदीला”  या अभियानांतर्गत वेण्णा नदीची संवाद यात्रेस वेण्णा लेक महाबळेश्वर येथून सुरुवात झाली.

महाबळेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्ल्वी पाटील यांच्या हस्ते वेण्णा लेक येथून अभियानास शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी, महाविद्यालय, शिक्षक वृंद, पर्यटक मोठया संख्येने उपस्थित होते.

मौजे मेटगुताड येथील ग्रामपंचायत कार्यालयात नदी संवाद अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळा व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी  चित्ररथासहीत प्रचार फेरी काढली होती. या फेरीमध्ये ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, शिक्षक वृंद सहभागी झाले होते.

संवाद अभियानात नदीचे महत्त्व नदी समन्वयक प्रदीप पाटणकर यांनी विस्तृतपणे  विशद  केले. तसेच उपअभियंता बजरंग चौधरी यांनी नदीबाबतची माहिती दिली. प्रा. जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!