जिल्हाधिकारी कार्यालयावर विक्रेत्यांनी भरवला चक्क बाजार

नो हॉकर्स झोनचे दुखणे सातार्‍यात कायम


दैनिक स्थैर्य । 16 मे 2025। सातारा। सातारा पालिकेने ठरवून दिलेल्या नोकर्स झोनचा विरोध विक्रेत्यांनी कायम ठेवला आहे पालिकेच्या या निर्णयाचा निषेध म्हणून छोट्या मोठ्या विक्रेत्यांनी रिपाई आघाडीच्या महिला पदाधिकारी पूजा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाचा एक भाग म्हणून विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्याच्या प्रवेशद्वारावरच चक्क बाजार भरवला .

मोती चौक ते पंचमुखी गणपती यादरम्यान नो हॉकर्स झोन या मुद्द्यावरून नगरपालिका प्रशासन व विक्रेते आमने सामने आले आहेत तब्बल तीन वेळा चर्चेच्या फेर्‍या होऊन सुद्धा यामध्ये कोणताही मार्ग निघालेला नाही बायोमेट्रिक सर्वे झालेले हॉकर्स यांना झोन दिला जाईल बाकीच्यांची जबाबदारी आम्ही घेणार नाही असे मुख्याधिकारी यांनी सांगितले मात्र हा निर्णयच विक्रेत्यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करत तेथेच बाजार भरविला या आंदोलनाचे नेतृत्व पूजाताई बनसोडे करत आहेतविक्रेत्यांचे हे आंदोलन दिवसभर सुरू होते येता-जाता या आंदोलनाने सातारकरांचे लक्ष वेधून घेतली जोपर्यंत पालिका प्रशासनाकडून आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!