दुचाकी लावण्याच्या वादातून संभाजीनगरमध्ये गाड्यांची तोडफोड; एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ सप्टेंबर २०२१ । सातारा । देगाव रोड ( संभाजीनगर ) अहिरे कॉलनी येथे दुचाकी लावण्याच्या वादातून तीन दुचाकींची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे घडला . अश्विन गायकवाड असे संशयिताचे नाव असून या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे .

मीना दिलीप जाधव – वय 50 यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे . त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार जाधव यांचा मुलगा तुषार हा पार्किंगमधील गाडी घेऊन बाहेर गेला . त्या जागेवर संशयित गायकवाड याने स्वतःची दुचाकी पार्क केली . यातून उद्भवलेल्या वादामध्ये गायकवाड याने जाधव यांच्या पोलो या चारचाकी तसेच करिझ्मा व अॅक्टिव्हा या गाडयांची तोडफोड करून त्यांचे नुकसान केले अशी तक्रार दिली आहे . पोलीस पुढील तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!