स्थैर्य, निंबळक : निंबळक गावचे सुपुत्र व डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राम निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निंबळक ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून १४ व्या वित्त आयोगातून घंटागाड्या घेतल्या आहेत. गेली ५ वर्षे नागरिकांच्या दृष्टीने विविध समाजउपयोगी उपक्रम राबवून संपूर्ण निंबळक गावचा सर्वांगीण विकास साधलेला आहे. निंबळक गावच्या सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी गावाच्या स्वच्छतेच्या दृष्टीने काळाची गरज ओळखत घंटागाडी घेतल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.