वीर सावरकर ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२२ । बारामती ।  जुन्या सभासद फी मध्ये कोणतेही वाढ न करता व नवीन होणाऱ्या सभासद यांना फी मध्ये वाढ करीत, वीर सावरकर स्वीमर्स क्लब ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

या वेळी सभेच्या अध्यक्ष स्थानी जवाहर वाघोलीकर यांची निवड करण्यात आली या प्रसंगी वीर स्वीमर्स क्लब चे अध्यक्ष डॉ अशोक तांबे, उपाध्यक्ष बाबुराव माने, सचिव प्रवीण अहुजा, संचालक सुनील जामदार, चंद्रगुप्त वाघोलीकर, ऍड विजय बर्गे, विश्वास शेळके, निईमुद्दीन खाईमी, प्रमोद सातव, अविनाश तावरे, अमोल गावडे, सल्लागार सदाशिव सातव, भारत गावडे, प्रताप गालिंदे आदी मान्यवर व सभासद उपस्तित होते.

कोरोनाच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या सभासद यांना श्रद्धांजली वाहून सभेची सुरुवात करण्यात आली. आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी स्वीमर्स क्लब चे खेळाडू जात असतील तर त्यांना आर्थिक मदत करणे,तहहयात सभासद करणे साठी तज्ञांचा सल्ला घेणे आदी विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

सभासद ना सर्व सोयी देत असताना राज्य, देश व आंतरराष्ट्रीय जलतरण खेळाडू तयार होणे साठी सहकार्य करू व लवकरच महिलांसाठी शेजारील मोकळ्या जागेत जलतरण तलाव ची उभारणी केली जाणार असल्याचे अध्यक्ष डॉ अशोक तांबे यांनी सांगितले.
या वेळी पांडुरंग कचरे, प्रकाश देवकाते, अनिल उघडे आदींनी विविध सूचना केल्या. कझाकिस्तान येथे झालेल्या आर्यरमॅन स्पर्धेत यशस्वी झालेल्या सभासद खेळाडूचा सत्कार व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या सभासद व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

अहवाल वाचन प्रवीण अहुजा यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!