माण तालुक्यातील संभूखेड येथील वीर जवान सचिन विश्वनाथ काटे यांना देशसेवा बजावत असताना वीरमरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑक्टोबर २०२१ | माण | माण तालुक्यातील संभूखेड येथील वीर जवान सचिन विश्वनाथ काटे वय 24 यांना देशसेवा बजावत असताना वीरमरण आले आहे. या घटनेमुळे माण तालुक्यासह संभूखेड गावात शोककळा पसरली आहे.

या बाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी माण तालुक्यातील संभूखेड गावचे सुपुत्र पाच वर्षापुर्वी इंडियन आर्मी मध्ये भर्ती होऊन देशसेवा बजावत होते.

माण तालुका हा कायम दुष्काळी तालुका म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. या तालुक्यात दुष्काळ हा पाचवीलाच पुजला आहे.निसर्ग हा कायम कोपलेला असतो. या भयावह अवस्थेत जनता जगत आहे. हाताला काम नाही. शेती ही निसर्गाच्या अवकृपेमुळे परवडत नाही.अशा भयानक परिस्थिती मध्ये केवळ शेती या व्यवसाया वर अवलंबून न रहाता शेतकर्याची मुले दुष्काळी परिस्थिती वर मात करण्यासाठी लष्करात भर्ती होऊन देशसेवा बजावण्यासाठी प्राधान्य देत असतात.

या पैकी माण तालुक्यातील संभूखेड येथील शेतकरी विश्वनाथ काटे यांचे दोन्ही सुपुत्र लष्करात भर्ती होऊन देशसेवा बजावत होते. वीर जवान सचिन विश्वनाथ काटे वय 24हे पाच वर्षापुर्वी इंडियन आर्मी मध्ये भर्ती होऊन राजस्थान येथे देशसेवा बजावत होते. तर रेवन विश्वनाथ काटे हा लहान भाऊ आसाम येथे देशसेवा बजावत आहे.

20ऑक्टोबर रोजी रात्री सचिन विश्वनाथ काटे हे देशसेवा बजावत असताना वीर मरण आल्याची माहिती भाऊ रेवन काटे यांना राजस्थान लष्कराच्या युनिट ने दिली असून सध्या वीर जवान सचिन काटे यांचे पार्थिव पुणे येथे लष्कराचे जवान घेऊन येत असून, शनिवार 22ऑक्टोबर रोजी संभूखेड या जन्म गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान या घटनेची माहिती समजताच प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी, तहसिलदार सूर्यकांत येवळे, सपोनि बाजीराव ढेकले यांनी संभूखेड येथे भेट दिली आहे.

वीर जवान सचिन काटे यांचे आई वडिल हे गावी शेती करत असून लहान भाऊ रेवन हा आसाम येथे देशसेवा बजावत आहे.
सचिन काटे यांच्या वीर मरणाची बातमीने माण तालुक्यासह संभूखेड गावा मध्ये शोककळा पसरली.


Back to top button
Don`t copy text!