दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२२ । सातारा । सातारा येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आणि सातारा जिल्हा अथेलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा 2022अंतर्गत येथील के. एस .डी. शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेजच्या इयत्ता नववी क मध्ये शिकणाऱ्या वेदांत मोरे याने जिल्हास्तरीय ऍथलेटिक्स कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये उंच लांब उडी प्रकारात आपल्या खेळाची उत्कृष्ट चुणूक दाखवत विशेष प्राविण्य मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेत सुंदर कामगिरी केली .
वेदांत याची निवड आता झोनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी झालेली आहे..या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक विद्यालयाचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग यांनी कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.संचालिका सौ.आचल घोरपडे, विद्यालयाच्या तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका आणि प्राचार्य सौ.रेखा गायकवाड ,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी तसेच क्रीडा प्रशिक्षक अभिजीत मगर, पालक संघाचे अध्यक्ष प्रतिनिधी शिक्षक, शिक्षिका व पालकांनी कौतुक करून अभिनंदन करून पुढील झोनल चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.