ना. शंभूराज देसाई यांच्यासोबत चर्चा करताना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले. शेजारी भैरवनाथ बोट क्लबचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ
स्थैर्य, सातारा, दि.२: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बामणोली, तापोळा येथील बोटींग आणि वासोटा कि‘ा पर्यटन गेल्या सात ते आठ महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाने बंद ठेवले आहे. बोटींग, पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय यावर बामणोली, तापोळा परिसरातील सुमारे २ ते अडीच हजार व्यवसायिकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. आता सर्वत्र सर्वकाही सुरु झाले आहे. त्यामुळे बामणोली, तापोळा येथील बोटींग आणि वासोटा पर्यटन पुर्ववत सुरु करावे, अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली. ना. देसाई यांनी प्रशासनाला आठवडाभरात बामणोली, तापोळा येथील बोटींग आणि वासोटा कि‘ा पर्यटन सुरु करण्याच्या सुचना केल्या. यामुळे बोटींग आणि पर्यटन लवकरच पुर्ववत सुरु होण्याचा मार्ग खुला झाला आहे. यासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून ना. शंभूराज देसाई यांची भेट घेतली आणि बामणोली, तापोळा येथील बोटींग आणि वासोटा कि‘ा पर्यटन पुर्ववत सुरु करण्याबाबत चर्चा केली. यावेळी भैरवनाथ बोट क्लबचे चेअरमन धनाजी संकपाळ, सचिव निलेश शिंदे, सर्व संचालक, बामणोलीचे सरपंच राजेंद्र संकपाळ यांच्यासह परिसरातील ग‘ामस्थ मोठ्या सं‘येने उपस्थित होते. ना. देसाई यांना याबाबत निवेदनही देण्यात आले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बामणोली, तापोळा येथील बोटींग आणि वासोटा कि‘ा पर्यटन गेल्या सात ते आठ महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार बंद आहे. दरम्यान, महाबळेश्वर येथील वेण्णा लेकमध्ये बोटींग आणि महाबळेश्वर आणि पाचगणी येथील पर्यटन सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे बामणोली, तापोळा येथील बोटींग आणि वासोटा कि‘ा पर्यटनही सुरु करणे आवश्यक आहे. बामणोली, तापोळा परिसरातील हजारो लोकांचा उदरनिर्वाह बोटींग आणि पर्यटनावर अवलंबून आहे. गेल्या सात- आठ महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. किमान दिवाळी नंतरच्या हंगामातील व्यवसायातून तरी येथील लोकांना उभारी मिळावी, यासाठी बामणोली, तापोळा येथील बोटींग आणि वासोटा कि‘ा पर्यटन त्वरीत सुरु करण्यात यावे, अशी आग‘ही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.
ना. देसाई यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार तत्काळ वन विभाग आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि बामणोली, तापोळा येथील बोटींग आणि वासोटा कि‘ा पर्यटन सुरु करण्याच्या सुचना केल्या. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे या चालू आठवड्यात बामणोली, तापोळा येथील बोटींग आणि वासोटा कि‘ा पर्यटन सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे बामणोली आणि तापोळा परिसरातील हजारो व्यावसायिकांचा मोठा प्रश्न सुटला असून यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे आणि ना. देसाई यांचे भैरवनाथ बोट क्लब आणि ग‘ामस्थांनी आभार मानले.