
दैनिक स्थैर्य । 8 मे 2025। सातारा । येथील ज्ञानविकास मंडळाच्यावतीने रविवार, दि. 11 ते गुरुवार, दि. 22 या कालावधीत श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये वसंत व्याख्यानमाला होणार आहे. व्याख्यानमालेचे हे 52 वे वर्ष असून, रोज संध्याकाळी 6.30 वाजता व्याख्याने होणार आहेत.
व्याख्यानमालेचा प्रारंभ रविवारी (दि. 11) तेर पॉलिसी सेंटर संस्थेच्या संस्थापक, यूएनईपी पुरस्कारविजेत्या पर्यावरण तज्ज्ञ आणि लेखिका डॉ. विनिता आपटे (पुणे) यांच्या ’साहित्य आणि पर्यावरण’ या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे.
सोमवारी (दि. 12) सातारच्या आर्यलोक हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद ओक यांचे ’बदलत्या जीवनशैलीत आयुर्वेदाचे महत्त्व’ या विषयावर
मंगळवारी (दि. 13) हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (पुणे) यांचे ’फाळणी कारणे, प्रक्रिया आणि परिणाम’ या विषयावर व्याख्यान
बुधवारी (दि. 14) सातार्यातील पत्रकारांचा ’बस्स झालं फोडाफोडीचं राजकारण’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे, मुकुंद फडके, जयंत लंगडे, मधुसूदन पत्की, गोविंद बेडकिहाळ सहभागी होणार आहेत
गुरुवारी (दि. 15) संगीत रंगभूमीच्या अभ्यासक आणि लेखिका सौ. अर्चना साने (पुणे) यांचे ’संगीत रंगभूमीचा इतिहास’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
शुक्रवारी (दि. 16) मुंबईच्या प्रसिद्ध कथाकथनकार सौ. सुषमा फडके यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम
शनिवारी (दि. 17) प्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांची मुलाखत होणार आहे. मुंबईतील निवेदक प्रदीप देसाई हे मुलाखत घेणार आहेत. ही मुलाखत न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात होणार आहे.
रविवारी (दि. 18) सातारचे गायक राजेंद्र पाटील, अजय घोरपडे, रमिजा सय्यद, गीता उधाणी आणि विनय कुलकर्णी यांचा ’साज और आवाज’ हा हिंदी गीतांचा कार्यक्रम
सोमवारी (दि. 19) माकप नेते अजित अभ्यंकर (पुणे) यांचे ’बेरोजगारीचं करायचं काय ?’ या विषयावर व्याख्यान
मंगळवारी (दि. 20) मुंबईचे गीतकार, संगीतकार आणि अभिनेता कविकिरण पाटील यांचा ’कविता गाते गाणे’ हा कार्यक्रम
बुधवारी (दि. 21) ज्ञानविकास मंडळाचे कार्याध्यक्ष प्रसाद चाफेकर यांचे ’स्वराज्य पुरस्कर्ते लोकमान्य’ या विषयावर व्याख्यान
गुरुवारी (दि. 22) शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अॅड. अनिल परब यांचे ’महायुती सरकार आश्वासनांची खैरात, पूर्तता किती?’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.