
सातारा – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणरायाच्या विविध मूर्ती तसेच गणेशाच्या घरगुती मूर्तीसाठी लागणारी विविध प्रकारची सुंदर आभूषणे म्हणजेच दागिने मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध झाले आहेत. सोन्याचे चढते भाव आणि चांदीने दराचा गाठलेला कळस पाहता सध्या इमिटेशन ज्वेलरी मध्ये सुद्धा असे सुरेख दागिने उपलब्ध झाले आहेत. देवाला नाजूक हार, कंठी, दुर्वा ,मोदक, विड्याचे पान, सुपारी, जास्वंदीचे फुल, केवड्याचे पत्र यासह चांदीचा मोदक, बाजूबंद, कंबरपट्टे असे अनेक दागिने स्टॉलवर उपलब्ध करण्यात आले.
(छाया : अतुल देशपांडे, सातारा)