
दैनिक स्थैर्य । 28 जून 2025 । फलटण । कोळकी ग्रामपंचायतीच्यावतीने वारकर्यांसाठी विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती ग्रामपंचायतीचे उपसरपंच डॉ. अशोक नाळे यांनी दिली.
कोळकी ग्रामपंचायतीच्यावतीने वारकर्यांसाठी पिण्याचे पाणी भरण्यासाठी टँकर पॉईंट दिले आहेत. ज्या ठिकाणी दिंडी मुक्कामी असतात. त्या ठिकाणी फरांडीच्या ट्रॅक्टर लावून लेव्हल करून जागा स्वच्छ केल्या आहेत वारकर्यांसाठी निवारा शेड उपलब्ध करून दिले आहे.
उघडा महादेव मंदिर कुरोली फूड याठिकाणी महिला व पुरुष वारकर्यांसाठी स्वतंत्रपणे स्नानगृहाची सोय उपलब्ध करून दिल्या आहेत. राव रामोशी पुल येथे कॅनलला बॅरिगेट्स व लाईटची सोय केली आहे. सर्व रस्त्यांच्या बाजूला डीडीटी पावडर टाकून घेण्यात आली आहे.
वारकर्यांच्या सेवेसाठी मोबाईल चार्जिंग स्टेशन सोय केली आहे. कोळकी कट्टा हॉटेल येथे मदत कक्ष स्थापन केली आहे. फलटण मध्ये येणार्या वारकर्यांसाठी या सर्व सोयीसुविधा कोळकी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केली आहे.
वारकर्याच्या सेवेसाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व तसेच ग्रामविस्तार अधिकारी, कर्मचारी उपलब्ध राहणार असल्याची माहिती उपसरपंच डॉ. अशोक नाळे यांनी दिली.