शासनाच्या विविध योजनांचा लोककलेच्या माध्यमातून जावली, पाटण, कराड व खटाव तालुक्यात जागर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ मार्च २०२२ । सातारा । राज्य शासनाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षात शासनाने लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, त्यांना योजना  सोप्या व सहज भाषेत समजावे म्हणून लोककलेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शासनाच्या योजनांचा जागर केला जात आहे.

त्रिरत्न सांस्कृतिक कला व सामाजिक संस्था कलापथकांच्यावतीने पाटण तालुक्यातील ढेबेवाडी, मल्हार पेठ व कराड तालुक्यातील उंडाळे व रेठरे बु,  लोकरंगमंच, सातारा यांच्या कलापथकाने जावली तालुक्यातील हुमगाव, कुडाळ, आनेवाडी व सायगाव तर  आधार सामाजिक विकास संस्थेच्या कलापथकाने खटाव तालुक्यातील खटाव, वडूज, मायणी व औंध येथील आठवडी बाजार व गर्दीच्या ठिकाणी लोककलेच्या माध्यमातून योजनांची माहिती दिली जात आहे.

कलापथकांद्वारे महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प, महाआवास अभियान, ई-पीक पहाणी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना, शिवभोजन थाळी योजना, शेतकऱ्यांसाठी विमा योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना, मीनाताई ठाकरे जल सिंचन योजना, ऊसतोड कामगारांसाठी विमा योजना, रमाई आवास योजना, कामगारांसाठी ई-श्रमिक कार्ड योजना, महामेट्रो, महामार्ग, रस्ते सुधार योजना, मुला मुलींसाठी मोफत शिक्षण यासह विविध योजनांची यासह विविध योजनांची लोककलेच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे.

गेल्या दोन दिवसांपासून ज्या गावांमध्ये कलापथकाचे कार्यक्रम होत आहेत त्या गावांमधील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी कलापथकामार्फत होणाऱ्या कार्यक्रमांचा लाभ घेऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!