दैनिक स्थैर्य | दि. ६ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटणमधील आध्यात्मिक क्षेत्रातील पूजनीय व्यक्तिमत्व आदरणीय राजनकाका देशमुख महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दि. ७ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांचा वाढदिवस शनिवार, दिनांक ७ डिसेंबर रोजी त्यांच्या महादेव माळ, कोळकी येथील शुभराज बिल्डिंगच्या प्रशस्त पार्किंगमध्ये साजरा करण्यात येणार आहे.
या ठिकाणी काका सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. दुपारी १२ ते २.३० वाजेपर्यंत स्नेहभोजन होणार आहे. त्यानंतर दुपारी २.३० ते ४.३० या वेळेमध्ये सत्कार समारंभ, भाषण, आभार आणि आरती होणार आहे.
सत्कारासाठी हार, फुले, बुके न आणता वह्या पुस्तके आणावीत आणि या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, बुधवार पेठ, शिवाजी रोड, फलटण यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे.