सोमंथळी हनुमानजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 12 एप्रिल 2025। फलटण । सोमंथळी (ता. फलटण) येथे हनुमानजन्मोत्सवानिमित्त शनिवार दि. 12 रोजी श्री स्वयंभू दक्षिणमुखी मंदिरामध्ये विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने शनिवार दि. 12 रोजी सकाळी 5 वाजून 51 मिनीटांनी गुलालाच्या उधळणीत हनुमानजन्मोत्सव होणार आहे. सकाळी 8 वाजता गावप्रदक्षिणा होणार आहे. दुपारी 3 वाजता कावडी काठी मिरवणुक होणार आहे. रात्री 9 वाजता श्रींचा छबिना मिरवणुक होणार आहे. रविवार दि. 13 सकाळी दहा वाजता लोकनाट्य तमाशा व संध्याकाळी 4 वाजता जंगी कुस्ती मैदानाचे आयोजित करण्यात आले आहे. भाविक भक्तांनी हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मारुती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय सोडमिसे पाटील व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

हनुमान जयंती उत्सवास मुंबई, पुणे, सोलापुर, पंढरपुर, बारामती येथू भक्त दर्शनासाठी येतात. 2010 पासून दर शनिवारी प्रवचन व कीर्तनाचे आयोजन केले जाते व फराळाचे वाटप, महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यात्रेच्या आठ दिवस अगोदर सप्ताह असतो. या मंदीराच्या परीसरात हनुमान देवस्थानट्रस्टच्या कमिटी मार्फत मंदीराचा जिन्होध्दार कलशारोहन व परीसरात पेवरब्लॅाकचे काम करण्यात आले आहे.

या मंदिराबाबत सांगितलेली आख्यायिका पुढीलप्रमाणे सातारा जिल्ह्यााचा पुर्व उत्तर भाग (फलटण-माण) पुर्वी दंडकारण्यात मोडत होता. अयोध्येतील प्रजेने सीतामातेच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने दुःखी होऊन प्रभू रामचंद्राने सीतेचा त्याग केला. रामाने त्याग केल्यानंतर सीतामातेने फलटण-माण (पूर्वीचे दंडकारण्य) येथे वास्तव केले. त्यानुसार या परिसरात सीतामातेने एका पर्णकुटीत वास्तव केले. याच ठिकाणी सीतामातेने लव व कुशांना जन्म दिला. कालांतराने रामाने अश्वमेध यज्ञाच्या निमित्ताने घोडा सोडला होता. तो घोडा फलटण पुर्वभागात लव- कुश या दोघांनी अडविला होता. त्या घोड्याला सोडविण्यासाठी रामाने भरत, शस्त्रुघ्न, लक्ष्मण यांना पाठविलेपरंतु तेही या दोन बालकांकडून पराभूत झाले. ही वार्ता रामाला समजताच रामाने हनुमानाला बोलावले त्याठिकाणी हनुमान आल्यानंतर सैनिकांनी घोडा सोडण्यास सांगितल्यानंतर लव-कुशने घोडा सोडविण्यास नकार दिला. क्रोधीतहोऊन हणुमंतांने युद्धाची तयारी केली. गदारूपी अस्त्र उचलले असता ती दोन बालके हनुमंताला रामरूपी दिसू लागली. त्यामुळे हनुमंत त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन हात जोडले. त्यावेळी लव-कुश यांनी हनुमंतास सोमंथळी येथील सोमरस नावाच्या लिंबाच्या झाडाला बांधल. सोमरस नावावरून समस्थस्थळ नाव पडले. व पुढे सोमंथळी हे नाव उदयाला आले. सोमंथळी येथील महिला शेणाच्या गोवर्‍या गोळा करीत असताना एका महिलेला शेणाच्यागोवरीखाली एक लाल रंगाचा कोंब दिसून आला. त्या महिलेने गावकर्‍यांनी तेथे खोदकाम केले असता त्या ठिकाणी साक्षात हनुमान प्रकट झाले. कालांतराने गावकर्‍यांनी येथे मंदीराची उभारणी केली. मंदीराचा पाया अठरा फुट खोल खोदण्यात आला आहे. सीतामातेचे डोंगरावरीलसीतामातेचे मंदीर फलटण येथील राममंदिर व सोमंथळी येथील हनुमान मंदीर ही तिन्ही मंदीरे एका सरळ रेषेत येतात. हे खास वैशिष्टय आहे. हे हनुमान मंदीर हे जागृत मंदिर म्हणून ओळखले जाते. येथे येणार्‍या सर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात.


Back to top button
Don`t copy text!