
दैनिक स्थैर्य । 28 एप्रिल 2025। विडणी । येथील सद्गुरु संतवर्य योगीराज श्री शिवाजी महाराज यांचा 51 वा पुण्यतिथी सोहळा सोमवार दिनांक 28 एप्रिल ते शुक्रवार दिनांक 02 मे अखेर होणार आहे. यानिमित्ताने पहाटे 5 वाजता काकड आरती, सकाळी 7 वाजता रुद्राभिषेक होईल. सोमवार दि. 28 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता गुरुचरित्र वाचन, दुपारी 12 वाजता आरती होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता हरिपाठ व अखंड नामस्मरणाने श्री च्या पुण्यतिथी उत्सव सोहळ्यास सुरवात होणार आहे. सायंकाळी 7 वाजता आरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
मंगळवार दि. 29 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता श्रींची आरती व महाप्रसाद होईल. दुपारी 2 वाजता गीत माऊली भजनी मंडळाचे भजन होईल. सायंकाळी 6 वाजता हरिपाठ होईल. बुधवार दि. 30 एप्रिल वैशाख शुद्ध अक्षय तृतीया (मुख्य दिवस) रोजी दुपारी 12 वाजता श्रीची महाआरती व महाप्रसाद होईल. दुपारी 2 ते 5 या वेळेत ॐ दत्त चिले ओम भजनी मंडळ व श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी 6 वाजता हरिपाठ, सायंकाळी 7 वाजता श्रींचा पालखी प्रदक्षिणा सोहळा होईल. आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. रात्री 12 वाजता श्री शंकर महाराज मठ धनकवडी यांचा जागर चा कार्यक्रम होईल.
गुरुवार दि. 1 मे रोजी दुपारी 12 वाजता श्रींची आरती व महाप्रसाद , दुपारी 2 ते 5 या वेळेत श्री सद्गुरु अवधूत भजनी मंडळ नाशिक यांचे भजन होईल. सायंकाळी 6 वाजता हरिपाठ, सायंकाळी 7 वाजता श्रींची आरती व महाप्रसाद रात्री 9 वाजता वाठार निंबाळकर येथील ह.भ.प. विकास निंबाळकर यांचे कीर्तन होणार आहे.
शुक्रवार दि. 2 मे सकाळी 8 वाजता गुरुचरित्र वाचन समाप्ती होईल. सकाळी 10 वाजता ह. भ.प. अक्षय महाराज कदम तावडीकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. दुपारी 12 वाजता ध्वजारोहण कार्यक्रम, श्रींची आरती व आरती होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे ॐ दत्त चिले ओम भजनी मंडळ, सद्गुरू शिवाजी महाराज भजनी मंडळ, फलटण, अवधूत भजनी मंडळ नाशिक, भागिरथी भजनी मंडळ, पुणे, हनुमान भजनी मंडळ, दहाबीघे यांचे सहकार्य राहणार आहे.
उत्सव काळात अखंड नामस्मरण, गुरुचरित्र वाचन, शंकर गीता पोथी वाचन असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन श्री योगीराज सद्गुरु श्री शिवाजी महाराज समाधी मंदिराचे मठाधिपती जयवंत कर्वे यांनी केले आहे.